जिल्ह्यात आणखी १५२२ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:46+5:302021-04-26T04:17:46+5:30
थोडा दिलासा; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हा थोडा दिलासा ...
थोडा दिलासा; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त
गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हा थोडा दिलासा मिळाला असून, रविवारी १५२२ रुग्ण बाधित आढळले तर १६४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सदर रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ४, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथील ५, जयहिंद सैनिक शाळा कोविड सेंटर उदगीर येथील ४, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ७, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २११, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, दापका कोविड केअर सेंटरमधील १०, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डींग देवणी येथील ४, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील २, बावची कोविड केअर सेंटरमधील ६, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ४५, शासकीय आयटीआय कॉलेज जळकोट येथील ३, समाजकल्याण वसतिगृह जळकोट येथील २, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३९, होम आयसोलेशनमधील १ हजार २३६ असे एकूण १ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.