लातूरमध्ये अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम बारगळली? भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळेना
By हणमंत गायकवाड | Published: March 20, 2024 04:36 PM2024-03-20T16:36:30+5:302024-03-20T16:36:59+5:30
लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
लातूर: भटक्या श्वानांचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन च्या सहकार्याने अँटीरेबीज लसीकरण मोहीम सुरू केल्याचा गाजावाजा करण्यात आला. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. परंतु त्यावर वारंवार कॉल करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना भ्रमणध्वनीच उचलला जात नाही. मग अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम कुठे चालू आहे,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी या श्वानांची टोळी रस्त्याने फिरत असते. रस्त्याने ही टोळी फिरत असताना यावेळी दुचाकी आली तर तिचा पाठलाग श्वान करतात. यामुळे दुचाकीस्वार घाबरून दुचाकीची स्पीड वाढवितो. परिणामी,अपघात होऊन गंभीर जखमी होण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याला आवर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभाग आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम सुरू केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही. फोन उचलला जात नाही, त्यामुळे भटक्या श्वानांची माहिती कोणाला द्यायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधला तर कोणीही उचलेना !
महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी ८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार संपर्क साधला तरी हा मोबाईल उचलला जात नाही. दरम्यान, ७३८५२२६८८८, ७७२०९७ ०५०६ व ८६६८७६९८२७ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी वारंवार प्रस्तुत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, परंतु भ्रमणध्वनी उचलला नाही. मग संपर्क साधण्याचे आवाहन कशासाठी? लातूर शहरातील प्रभागात जाऊन भटक्या श्वनांना लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी फोन उचलला जात नाही. दर शनिवारी त्या त्या परिसरात जाऊन अँटीरेबीज लसीकरण करणे महानगरपालिकेचा मनोदय आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती या क्रमांकावर द्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
वृद्ध नागरिक,लहान मुलांना भटक्या श्वानांचा त्रास
वृद्ध नागरिक,लहानमुलेवमहिलांनाभटक्याश्वानांचात्रासआहे. अँटीरेबीज लसीकरण तसेच निर्बीजीकरणनुसताच फार्स करण्यात आलेलाआहे वास्तवातकामठप्पआहे. ज्यासंस्थेकडेहेकाम मनपाने सोपवले आहे. त्यासंस्थेवर मनपाचे नियंत्रण नाही. हे यावरून सिद्ध होत आहे.