ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी अर्ज करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:49+5:302020-12-24T04:18:49+5:30
लेखा व कोषागार सहसंचालकांची पाहणी लातूर - लेखा व कोषागार सहसंचालक औरंगाबाद उत्तम सोनकांबळे यांनी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयास ...
लेखा व कोषागार सहसंचालकांची पाहणी
लातूर - लेखा व कोषागार सहसंचालक औरंगाबाद उत्तम सोनकांबळे यांनी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. कामकाजाची पद्धती, कामाचा तात्काळ निपटारा करणे, प्रकरण विनाविलंब निकाली काढणे आदी बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राधाकिशन राऊत, वाजीद शेख, एम.आर. जोशी, एस.डी. तारळकर, बी.ए. कोल्हापुरे, बी.के. पठाण, सूर्यवंशी, घोलप, सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
गुरुवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
लातूर - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत करण्यात आले आहे. यानिमित्त ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरूप या विषयावर ऑनलाईन वेबिनार होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष यांनी कळविले आहे.
निर्यातक्षम फळे ऑनलाईन नोंदणी करावी
लातूर - जिल्ह्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा, फळपीक व विविध भाजीपाला पिकांची लागवड करून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येते. जिल्ह्यातील द्राक्षांना विदेशातून मागणी आहे. त्यामुळे निर्यातीतून चांगला नफा मिळू शकतो. आतापर्यंत १०८ निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली आहे. ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यास अंतिम मुदत असून, निर्यातीच्या दृष्टीने द्राक्षी बागायतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लेबर कॉलनी परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर - शहरातील लेबर कॉलनी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबलेल्या असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यातच कचरा संकलनासाठी नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून होत आहे.