साेन्याची ‘रेकाॅर्ड’ब्रेक दरवाढ; ६५ हजारांचा टप्पा ओलांडला !
By राजकुमार जोंधळे | Published: December 2, 2023 08:12 PM2023-12-02T20:12:44+5:302023-12-02T20:12:52+5:30
लातुरात २४ कॅरेट साेन्याचा दर ६५ हजार ४०० रुपयांवर...
राजकुमार जाेंधळे / लातूर : तिकडे आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरु केले आहेत. तर इकडे शनिवारी साेन्याच्या दरात रेकाॅर्डब्रेक दरवाढ झाली आहे. गत आठवड्यात प्रतिताेळा तब्बल दाेन हजारांनी साेने वधारले आहे. लातूरच्या सराफा बाजारात शनिवारी प्रतिताेळा २४ कॅरेट साेने ६३ हजार ७०० रुपयांवर हाेते. हाच दर जीएसटीसह ६५ हजार ४०० रुपयांवर गेला. कधी नव्हे एवढी विक्रमी साेन्याची दरवाढ झाली असून, चांदीही प्रतिकिलाे ७७ हजारांवर पाेहचली असून, जीएसटीसह तब्बल ७९ हजार ३०० रुपयांवर गेली आहे.
तुलसी विवाह साेहळ्यानंतर लग्नसराई हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी साेन्या-चांदीच्या मागणीत अचानक झपाट्याने वाढ झाली असून, या काळात साेन्या-चांदीचे दर मात्र दिवसेंदिवस आवाक्याबाहर जात आहेत. आठवडाभारात तब्बल दाेन हजारांनी साेन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सध्याला जागतिक पातळीवर बाजारपेठेत हाेणाऱ्या घडामाेडी आणि युद्धाचा परिणाम देशातील साेन्या-चांदीच्या रेकाॅर्डब्रेक दरवाढीवर हाेत आहे, असा अंदाज स्थानिक सराफा व्यापाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे. लग्नसराईमुळे अचानकपणे साेन्या-चांदीच्या खरेदीची उलाढाला वाढली आहे. लातुरातील सराफा बाजारात शनिवारी साेने प्रतिताेळा ६३ हजार ७०० रुपयांवर हाेते. हाच दर तीन टक्के जीएसटीसह ६५ हजार ४०० रुपयांवर गेला हाेता. चांदी प्रतिकिलाे ७७ हजार रुपयांवर हाेती तर तीन टक्के जीएसटीसह ती ७९ हजार ३०० रुपयांवर गेली हाेती.
साेन्या-चांदीचे दर वाढण्याचा अंदाज..!
येत्या काही दिवसात साेन्या-चांदीचे दर वाढण्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यातून व्यक्त हाेत आहे. लग्नसराईत मागणी वाढली असून, जागतिक घडामाेडीमुळे दरवाढ हाेत आहे. परिणामी, सामान्यांचे साेने खरेदीचे बजेट काेलमडले आहे. तर लग्नघरात मात्र साेने खरेदी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. आता अनेकांनी साेने खरेदी करण्यासाठी दर घसरतील का? याची वाट पहायला सुरुवात केली आहे.