मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्य अन् केंद्रीतील तब्बल सात मंत्री आज लातुरात

By हणमंत गायकवाड | Published: May 10, 2023 04:56 PM2023-05-10T16:56:58+5:302023-05-10T16:57:31+5:30

औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाचा विवाह तसेच त्यांनी आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा आज सायंकाळी होत आहे.

As many as seven ministers from the state and the central government along with the chief minister and deputy chief minister are in Latur | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्य अन् केंद्रीतील तब्बल सात मंत्री आज लातुरात

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्य अन् केंद्रीतील तब्बल सात मंत्री आज लातुरात

googlenewsNext

लातूर : औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाचा तसेच त्यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तसेच केंद्रीय मंत्री लातुरात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील पाच आणि केंद्रातील दोन मंत्र्यांचा दौरा अधिकृत आला आहे.

औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाचा विवाह तसेच त्यांनी आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा बुधवारी सायंकाळी होत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे आणि राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा या विवाह सोहळ्यानिमित्त निश्चित आहे. यातील काही मंत्री लातूर व औसा येथे आलेले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडूनही प्रस्तुत मंत्र्यांचा दौरा आला आहे.

Web Title: As many as seven ministers from the state and the central government along with the chief minister and deputy chief minister are in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.