ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:16+5:302021-01-24T04:09:16+5:30

शेतात जाण्याच्या कारणावरून मारहाण लातूर : गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शेतातून जाण्याच्या कारणावरून भांडणाची कुरापत काढून ...

Assault on Gram Panchayat elections | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून मारहाण

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून मारहाण

Next

शेतात जाण्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शेतातून जाण्याच्या कारणावरून भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना किनीनवरे शेतशिवारात घडली. या प्रकरणी विश्वनाथ लक्ष्मण गायकवाड यांच्या तक्रारीवरून संतोष माधव गायकवाड व सोबत असलेल्या चार जणांविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. उस्तुर्गे करीत आहेत.

शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन सादर करावेत

लातूर : शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१९-२० साठी री-अप्लाय करण्यासाठी व २०२०-२१ या वर्षासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

वनिता कांबळे यांचा लातुरात सत्कार

लातूर : मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने लातुरात ग्रा. पं. निवडणुकीतील विजयी उमेदवार वनिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आनंतराव लांडगे, हणमंत जाकते, विनायक कांबळे, रेखा कांबळे, निर्मला थोटे, नागोराव कांबळे, सुधाकर कांबळे, अंतेश्वर थोटे, अभिमन्यू सवई, डी. टी. सूर्यवंशी, मिलिंद गायकवाड, एस. एस. सातपुते, एम. एम. माकणीकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

माय फाउंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

लातूर : शहरातील भालचंद्र ब्लड बँक येथे माय फाउंडेशनची बैठक पार पडली. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शेख सादिक ताहेर यांची तर उपाध्यक्षपदी अझहर अकबर शेख यांची निवड करण्यात आली. तसेच फाउंडेशनच्या वतीने २१ मार्च रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नावनोंदणीसाठी माय फाउंडेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेषेराव कुलकर्णी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

लातूर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी शेषेराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष उमेश यादव यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसनराव काशीद यांनी सदरील निवड केली. यावेळी दत्तप्रसाद अबिलवादे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आगामी काळात संघटनवाढ तसेच सर्वसामान्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Assault on Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.