सिनेस्टाईल अपहरण करून युवकावर गुप्ती, राॅडने प्राणघातक हल्ला

By राजकुमार जोंधळे | Published: September 6, 2022 07:26 PM2022-09-06T19:26:50+5:302022-09-06T19:28:36+5:30

या प्रकरणी सहाजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

assaulted youth by abducting Cinestyle in latur | सिनेस्टाईल अपहरण करून युवकावर गुप्ती, राॅडने प्राणघातक हल्ला

सिनेस्टाईल अपहरण करून युवकावर गुप्ती, राॅडने प्राणघातक हल्ला

Next

लातूर : जिल्ह्यातील अंधाेरी येथील एका १९ वर्षीय युवकाला सिनेस्टाईल पद्धतीने माेटारसायकलवर बसवून साेयाबीनच्या शेतात नेऊन त्याच्यावर गुप्ती, राॅड, लाकडाने आणि बेल्टने जबर मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत युवक बेशुद्धावस्थेत पडल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून धूम ठाेकली. ही घटना अहमदपूर शहरानजीक २८ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात मंगळवारी सहाजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी ऋतिक संताजी उजणकर (वय १९ रा. अंधाेरी, ता. अहमदपूर) हा आपला मित्र प्रेम पाटील याच्यासाेबत घरी गेला असताना, आराेपीने प्रेम याला फाेन करून, एका बारच्या पाठीमागे काम आहे म्हणून बाेलावून घेतले. दरम्यान, फिर्यादी आणि त्याचा मित्र प्रेम पाटील हे तेथे गेले असता, विठ्ठल पवार याच्यासह अन्य पाचजणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शेंड्यासाेबत असलेल्या अन्य काहीजणांनी त्यांना मारहाण केली. गुप्ती पाठीला लावून बळजबरीने माेटारसायकलवर बसवून एका मंगल कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात साेयाबीनच्या शेतात नेले. यावेळी सहाजणांनी संगनमत करून गुप्ती, राॅड, लाकडाने आणि बेल्डने दाेन्ही हातावर, पाठीवर, छातीवर, कमरेवर जबर मारहाण केली. यावेळी गळ्याला सुरी लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय, मित्राला जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत बेशुद्धावस्थेत एका शाळेच्या पाठीमागील परिसरात टाकून मारेकरी पसार झाले, असे फिर्यादीने पाेलिसांना सांगितले. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर अहमदपूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून विठ्ठल पवार याच्यासह अन्य पाचजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक केदार करत आहेत.

 

Web Title: assaulted youth by abducting Cinestyle in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.