ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

By आशपाक पठाण | Published: August 15, 2022 02:44 AM2022-08-15T02:44:54+5:302022-08-15T02:45:34+5:30

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले.

ATS Police Sub-Inspector Mahebub Gallekatu awarded President's Medal Outstanding Performance in German Bakery Blast Case | ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

googlenewsNext

लातूर : येथील दहशतवाद विरोधी कक्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले गुलाम महेबूब गुलाम हैदर गल्लेकाटू यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पोलीस पदक रविवारी जाहीर करण्यात आले. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, निलंगा येथील महामंडळाच्या कर्मचाऱ्याची लूट आदी प्रकरणांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. 

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले. त्यांनी लातूर शहर, शिरूर अनंतपाळ, गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण पथक, उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण, शहर वाहतूक शाखा आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. सध्या ते दहशतवाद विरोधी कक्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

२०१३ मध्ये एटीएसमध्ये कार्यरत असताना पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, परभणी येथील आयएसआय तपासात भरपूर मेहनत घेतली. २००८ मध्ये निलंगा येथील एसटी महामंडळाच्या रोखपालाचे १२ लाख लूट प्रकरण, नळेगाव येथील एसटीत स्फोट प्रकरणातील आरोपींना २४ तासांत अटक केली. यासह विविध प्रकरणांच्या तपासकामात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांच्या कार्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन अपर पोलीस महासंचालक, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक यांच्याकडून वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. पदक जाहीर होताच महेबूब गल्लेकाटू यांचा त्यांच्या पत्नी सईदा बेगम, मुलगा गुलाम मुज्तबा, मुलगी जुवेरिया यांनी पेढा भरवून कौतुक केले.

३६ वर्षांतील सेवेचे फळ मिळाले...
गुलाम महेबूब गल्लेकाटू म्हणाले, मागील ३६ वर्षांपासून मी लातूर जिल्हा पोलीस दलात विविध ठिकाणी काम केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अनेक गुन्ह्यांचे तपास केले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो. शासनाकडून मिळालेल्या या प्रेरणेमुळे उर्वरित सेवेत आणखीन उत्साहाने काम करता येईल.

Web Title: ATS Police Sub-Inspector Mahebub Gallekatu awarded President's Medal Outstanding Performance in German Bakery Blast Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.