औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत

By हणमंत गायकवाड | Published: May 6, 2024 12:30 PM2024-05-06T12:30:35+5:302024-05-06T12:30:51+5:30

यापूर्वीच हवामान केंद्राने ‘५ मे’ हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता.

Aurad Shahjani records high temperature of 44.5 degrees, heat disrupts daily life | औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत

औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत

औराद शहाजानी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औराद शहाजनी परिसरात चौथ्या दिवशीही उष्णतेची लाट असून, रविवारी वर्षभरातील उच्चांकी ४४.५ तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर रविवारी ४४.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २६ अंशांची नोंद झाली आहे. वाढीव तापमानामुळे परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. पूर्वेकडून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सीमा भागातून उष्णतेची लाट येत असल्यामुळे या भागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यापूर्वीच हवामान केंद्राने ‘५ मे’ हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता. पुढील काळामध्ये काही दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे राहणार असले तरी या आठवड्यात शेवटच्या दिवसांमध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात होऊन ९ ते १० तारखेनंतर या भागामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Aurad Shahjani records high temperature of 44.5 degrees, heat disrupts daily life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.