औसा पाेलिसांनी जीपसह ११६ किलो गांजा पकडला; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By राजकुमार जोंधळे | Updated: March 20, 2025 09:29 IST2025-03-20T09:28:03+5:302025-03-20T09:29:48+5:30

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती...

Ausa police seize 116 kg of ganja along with a jeep | औसा पाेलिसांनी जीपसह ११६ किलो गांजा पकडला; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

औसा पाेलिसांनी जीपसह ११६ किलो गांजा पकडला; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

औसा (जि. लातूर) : तेलंगणा, ओडिशा राज्यातून चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक करणाऱ्या दाेघांना तब्बल ११६ किलाे गांजासह बुधवारी रात्री उशिरा जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून जीप, माेबाईल आणि गांजाची पाेती असा एकूण १५ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्दमाल जप्त केला आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. 

पाेलिसांनी सांगितले, रमेश आर (वय ५३, रा. अबलापूर ता. वरंगल, तेलंगणा) आणि निबास बडई (वय ५६, रा. ओडिशा) हे दोघे तेलंगणासह इतर राज्यातून चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक करत असल्याचे समाेर आले आहे. ते औसा शहरासह इतर ठिकाणी विक्री करत होते. अशी माहिती पाेलिसांनी दिली. बुधवारी ते ११६ किलो गांजा स्कॉर्पिओ जीपमधून (ए.पी. २० एन. ३६३७) औसा शहरातील फुले नगरमध्ये देणार असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी फुलेनगर परिसरात एका घरासमाेर सापळा लावला. जीप दाखल हाेताच पाेलिसांनी छापा मारला. यावेळी दाेघांना अटक केली तर तिसरा पाेलिसांच्या हातून निसटला. जीपची झडती घेतली असता, त्यात गांजा भरलेली पाेते आढळून आले. यावेळी ११६ किलाे गांजा, जीप आणि दाेन माेबाईल असा १५ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्दमाल जप्त केला. घटनास्थळी औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी यांनी भेट दिली.

ही कारवाई औशाचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, सपोनि. बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, संजय कांबळे, मुब्बास सय्यद, रामकृष्ण घुटे, मारुती घुले, गोविंद पाटील, महिला पोलिस कर्मचारी सरवदे यांच्या पथकाने केली.

Web Title: Ausa police seize 116 kg of ganja along with a jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.