राज्य ऊस नियंत्रण मंडळ समितीवर अविनाश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:46+5:302021-05-16T04:18:46+5:30
डॉ. सी.सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसापासून तयार होणाऱ्या कारखान्यातील साखर व उपपदार्थापासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या ७०:३० सुत्रावर आधारित राज्यातील ...
डॉ. सी.सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसापासून तयार होणाऱ्या कारखान्यातील साखर व उपपदार्थापासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या ७०:३० सुत्रावर आधारित राज्यातील सर्व साखर कारखानेनिहाय अंतिम ऊस दर ठरविण्यासाठी कायदा आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत साखर कारखान्यांचे पाच व शेतकरी प्रतिनिधी पाच अशा दहा अशासकीय सदस्यांसह अन्य सरकारी प्रतिनिधी आहेत. यात अविनाश जाधव यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे कौतुक माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, सिध्दी शुगरचे संचालक सुरज पाटील, संचालिका दिपाली जाधव, व्हा. चेअरमन पी.जी. होनराव, टेक्निकल जनरल मॅनेजर बी.के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, प्रोसेस जनरल मॅनेजर सी.व्ही. कुलकर्णी, चिफ फायनान्स ऑफिसर राजपाल शिंदे, एस.बी. शिंदे, एल.आर. पाटील, धनराज चव्हाण आदींनी केले.