विलास सिंदगीकर यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:13+5:302020-12-09T04:15:13+5:30

स्वामी विवेकानंद विद्यालयाची पाहणी लातूर : लातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सी.एस. म्हेत्रे व जी.एफ. राठोड यांनी स्वामी विवेकानंद ...

Award to Vilas Sindgikar | विलास सिंदगीकर यांना पुरस्कार प्रदान

विलास सिंदगीकर यांना पुरस्कार प्रदान

Next

स्वामी विवेकानंद विद्यालयाची पाहणी

लातूर : लातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सी.एस. म्हेत्रे व जी.एफ. राठोड यांनी स्वामी विवेकानंद विद्यालयास भेट दिली. यावेळी कोरोना उपाययोजनांचे पालन करीत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच ऑनलाईन उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. विद्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम

लातूर: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, पृथ्वीराज सिरसाट, गणपतराव बाजुळगे, राजेसाब सवाई, रफिक सय्यद, स्वयंप्रभा पाटील, मोहन सुरवसे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, ॲड. प्रमोद जाधव, गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

विचारमंचतर्फे अभिवादन

लातूर : सम्यक विचार मंचच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी केशव कांबळे, लक्ष्मण खंडागळे, विनोद खटके, बालाजी कांबळे, भगवान वाघमारे, हर्षवर्धन सवई, नागेश वाघमारे, संजय सोनकांबळे, अनिल गायकवाड, अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

तुरीचा झाला खराटा

लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा परिणाम तूर पिकावर झाला असून, कासार शिरसी परिसरात तुरीचा खराटा झाला आहे. वातावरण बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हाताशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फुलगळतीसाठी फवारणी केली होती.

कबीर शेख यांची उपाध्यक्षपदी निवड

लातूर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या लातूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी कबीर शेख यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सरचिटणीस प्रशांत कवडे, इरफान शेख, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील, चंदन पाटील नागराळकर, समीर शेख आदींनी कौतुक केले आहे.

ब्याळे यांचा सत्कार

लातूर : रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने इंजि. गिरीश ब्याळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. नंदकिशोर लोया, संजय बोरा, डाॅ. ओमप्रकाश मोतीपवळे, ॲड. विश्वनाथ पंचाक्षरी, श्रीकांत अग्रोया, अरुण माने, बाळासाहेब खैरे, जितेंद्र कोरे, चंद्रकांत गुंडरे आदींसह रोटरी क्लब ऑफ लातूरच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मित्रमंडळातर्फे अभिवादन

लातूर : अखिल भारतीय युवा मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दयानंद सिरसाठे, विशाल कांबळे, आनंद लातूरकर, अरुण कांबळे, गौतम कांबळे, संजय घुगे, मिलिंद बानाटे, दीपक साबणे, संजय पाडोळे, भारत लामतुरे, सतीश भोसले, पंडित वलांडे, अनिरुद्ध बनसोडे उपस्थित होते.

लाहोटी कन्या विद्यालयात अभिवादन

लातूर: शहरातील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, सुनंदा कुलकर्णी, वर्षा देशपांडे, आशा लोंढे, गार्गी पाटील, प्रतीक्षा थोरात, शालिनी आघाव, रिशा कांबळे, अपूर्वा जाधव, राधा दायमा, माहेश्वरी म्हेत्रे, डिंपल कोंडेकर, संजयादेवी गोरे, नयन राजमाने, कविता सावंत आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Award to Vilas Sindgikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.