कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:59 AM2021-01-08T04:59:45+5:302021-01-08T04:59:45+5:30
... सटवाजी कांबळे, कौशल्या पवार यांची निवड किनगाव : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या तालुका समन्वयकपदी मुख्याध्यापक ...
...
सटवाजी कांबळे, कौशल्या पवार यांची निवड
किनगाव : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या तालुका समन्वयकपदी मुख्याध्यापक सटवाजी कांबळे, तर महिला समन्वयकपदी शिक्षिका कौशल्या पवार यांची निवड झाली आहे. ही निवड समन्वयक सतीश सातपुते, कमलाकर सावंत, जिल्हा महिला समन्वयक शोभा माने यांनी केली. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, विस्तार अधिकारी नानासाहेब बिडवे, नंदकुमार कोनाळे, मोहनराव जाधव, प्रल्हाद केंद्रे, गोपाळ गुट्टे, सुनील हामणे, परमेश्वर बालकुंदे यांनी केले.
...
सुरेखा कौरवाड यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
रेणापूर : तालुक्यातील राजेवाडी येथील सहशिक्षिका सुरेखा कौरवाड या सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संसदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य तथा जिल्हाध्यक्ष मंगेश सुवर्णकार, व्यंकट कौरवाड, किडिले, गणेश भिंगोले आदी उपस्थित होते.
...
सेवानिवृत्त धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार
लातूर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या लातूरच्या मुख्य शाखेत कार्यरत असलेले धनंजय कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा बाभळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक सोहम खरात, उपव्यवस्थापक बापूराव भगत, राजेंद्र परसबोणे, दास, नागेश मस्के आदी उपस्थित होते.
...
चापोली येथे श्रीहरी वेदपाठक यांचा सत्कार
चापोली : येथील संजीवनी महाविद्यालयात उपप्राचार्य श्रीहरी वेदपाठक यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्था सचिव डॉ. नारायणराव चाटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. धनंजय चाटे, संस्था संचालक बब्रुवान आवस्कर, उपप्राचार्य डॉ. भालचंद्र चाटे, मनोहर कदम, प्राचार्य डॉ. नीळकंठ पाटील, प्रा. द.मा. माने, प्रा. रामचंद्र माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप मुंडे यांनी केले, तर आभार प्रा.डॉ. महेबूब पठाण यांनी मानले.
...
नागनाथ खंदाडे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार
निलंगा : येथील तहसील कार्यालयात तलाठी पदावर कार्यरत असलेले नागनाथ खंदाडे यांची शिरूर अनंतपाळ येथे मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा ओबीसी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, बालाजी शिंदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय हलगरकर, हरिभाऊ सातपुते, गाेविंद सूर्यवंशी, मंडळ अधिकारी देशमुख आदी उपस्थित होते.