आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

By admin | Published: January 7, 2017 06:43 PM2017-01-07T18:43:06+5:302017-01-07T18:43:06+5:30

रक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे, असा आरोप डॉ़. बाबा आढाव यांनी केला.

Baba Amartav tried to break apart the question of reservation: Baba Adhav | आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

आरक्षणाच्या प्रश्नावर बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बाबा आढाव

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ -  आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत. या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेने सुरू केला आहे. हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़. बाबा आढाव यांनी येथे शनिवारी विचारला.
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अ‍ॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगल यांची उपस्थिती होती़. प्रास्ताविक शिवाजी माडे यांनी केले.
प्रारंभी जातीच्या उतरंडीला अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाबा आढाव म्हणाले, जातीअंताबाबत पुरकबाबी पुरोगामी सांगतात़ आजच्या शिक्षणात जातीअंताच्या शिक्षणाची सोय नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. आता नवा विचार दाबता येणार नाही़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा प्रखड सवालही त्यांनी उपस्थित केला़. आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे. शेतक-यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़, शेतक-यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़. भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाºया घटना बदलाचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे, असेही बाबा आढाव म्हणाले. यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़.
 
शेतकयांबाबत सरकार गंभीर नाही़
महात्मा फुलेंच्या काळातही शेतकरी कर्जबाजारी होता़ मात्र त्याला जगण्यासाठी पर्याय होते़. त्यामुळे शेतक-यांनी त्या काळात आत्महत्या केल्या नाहीत़ शेतीसारख्या असलेल्या भांडवलातून तो जगत होता़. गुरा-ढोरांची गोठ्यात संख्याही मोठी होती़ बांधावर झाडेही होते़ त्यामुळे संकट काळात या भांडवलाचा शेतक-यांना आधार होता़. आता मात्र शेतात नापिकी आहे, गोठ्यात गुरे-ढोरे नाहीत आणि म्हणावे तसे भांडवलही नाही त्यामुळे समाजातील शेतकºयांची पत घसरली आहे़ यातूनच शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत़ शेतकºयांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी केला. शेतक-यांचे कर्जबळी व व्यवस्था परिवर्तन या विषयावर ते बोलत होते़

Web Title: Baba Amartav tried to break apart the question of reservation: Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.