यशवंत विद्यालयात बदिमे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:24+5:302021-01-08T05:01:24+5:30
एस.पी. म्हेत्रे यांची शाळेस भेट लातूर : लातूर पंचायत समितीचे विषय शिक्षक एस.पी. म्हेत्रे यांनी स्वामी विवेकानंद विद्यालयात भेट ...
एस.पी. म्हेत्रे यांची शाळेस भेट
लातूर : लातूर पंचायत समितीचे विषय शिक्षक एस.पी. म्हेत्रे यांनी स्वामी विवेकानंद विद्यालयात भेट देऊन पाहणी केली. बैठक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य तपासणी, अभ्यासक्रमाचे नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी समन्वयक नीळकंठराव पवार, मुख्याध्यापक मोहन खुरदळे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
५ हजार क्विंटल तुरीची आवक
लातूर : बाजार समितीत ५ हजार ४२८ क्विंटल मंगळवारी आवक झाली. त्याला ६ हजार ३२५ रुपयांचा कमाल, ५ हजार ९०० रुपयांचा किमान तर ६ हजार ७५ रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. यासोबतच २० हजार २४१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ४ हजार ३५० रुपयांचा दर मिळाला. गहू, ज्वारी, पिवळी ज्वारी, हरभरा, मूग, उडीद, करडई आदी पिकांची आवक होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
बाजार समितीत मास्कचे वाटप
लातूर : बाजार समितीमध्ये हमाल, मापाडी कामगारांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी नागेश वाघमारे, सचिन मस्के, राजकुमार होळीकर, संजय सोनकांबळे, बालाजी गवळी, महादेव काळे, लखन साबडे, बशीर शेख, जीवन मोठे, प्रभाकर सोनवणे, रज्जाक शेख, मुक्ताराम गायकवाड, अंकुश पाडुळे, शरद कसबे, शेषेराव वाघमारे उपस्थित होते.
श्री केशवराज विद्यालयात बक्षीस वितरण
लातूर : येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी धनंजय कुलकर्णी, देविदास कुलकर्णी, महेश कस्तुरे, रंजना साकोळे, प्रिया मोहिते, बालासाहेब केंद्रे, संदीप देशमुख, इंदू ठाकूर, तेजस्विनी सांजेकर, शैलेश सुपलकर आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
शहर पूर्वभाग कृती समितीचे निवेदन
लातूर : शहर पूर्वभाग कृती समिती शिष्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ॲड. आनंद सोनवणे, बाबासाहेब बनसोडे, दीपक गंगणे, शंकर जाधव, गौतम सासणे, विशाल मोकाशे, इस्माईल शेख, मुन्वर शेख आदींसह समिती सदस्यांची उपस्थिती होती.