लातूर येथे बहूजन रक्षक दलाचे धरणे आंदोलन

By संदीप शिंदे | Published: February 22, 2023 05:19 PM2023-02-22T17:19:34+5:302023-02-22T17:20:05+5:30

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन, प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी

Bahujan Rakshak Dal protest at Latur | लातूर येथे बहूजन रक्षक दलाचे धरणे आंदोलन

लातूर येथे बहूजन रक्षक दलाचे धरणे आंदोलन

googlenewsNext

लातूर : बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, राजर्षी शाहू महाराज विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्ती योजना मातंग समाजासाठी स्वतंत्र निर्मिती करावी, अनूसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड, समन्यायी वाटपासाठी वर्गीकरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहूजन रक्षक दलाच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

शासनाने बार्टी संस्थेची स्थापना केली आहे. त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, यासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथे जवाब दो आंदोलन करण्यात येत आहे. त्यास या आंदोलनाद्वारे पाठिंबा देण्यात आला. आंदोलनात दिनकर मस्के, के.के. मुखेडकर, संतोष मस्के, पांडूरंग मोरे, चंद्रकांत गोढाळकर, दशरथ मस्के, बी.एस. कांबळे, संतोष पटनूरे, विनोद लोंढे, प्रा.डॉ. शिवशंकर कसबे, वामन हजारे, तुकाराम पारडे, धनशाम मस्के, पी.के. सावंत, आदिनाथ कंधारे, विठ्ठल जंगापल्ले, शिवाजी मस्के, तुकाराम केदासे, नरसिंग जोहारे, संतोष शिंदे, अमृत भोगे, रमाकांत कसबे, तानाजी शिंदे, भानुदास साळूंके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Bahujan Rakshak Dal protest at Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.