जिल्ह्यातील ५०० शाळांत राबविला जाणार ‘बाला’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:21+5:302020-12-04T04:58:21+5:30
पहिल्या टप्प्यासाठी या शाळांची निवड प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाला उपक्रमासाठी अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, गुगदळ, उदगीर ...
पहिल्या टप्प्यासाठी या शाळांची निवड
प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाला उपक्रमासाठी अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, गुगदळ, उदगीर तालुक्यातील राऊचीवाडी, साळवेनगर, हेर, औसा तालुक्यातील हासेगाववाडी, मंगरूळ, चाकूर तालुक्यातील अलगरवाडी, रायवाडी, देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा, कमालवाडी, निलंगा तालुक्यातील भूतमुगळी, मदनसुरी, रेणापूर तालुक्यातील फरदपूर तांडा, कौळगाव तांडा, लातूर तालुक्यातील मांजरी, निवळी, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आदी शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्याना उपक्रम
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. गटस्तरावर कार्यशाळा घेण्यात येत असून शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे बहुतांश शाळांचा कायापालट होणार असून, लोकसहभाग तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळांच्या विकासाला गती मिळणार आहे, तसेच शिक्षण विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात येणार असून, गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.