बाला उपक्रमासाठी २५ लाखांचा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:20 AM2021-09-25T04:20:12+5:302021-09-25T04:20:12+5:30
तालुक्यातील उत्का (अ.) येथे आयोजित तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे ...
तालुक्यातील उत्का (अ.) येथे आयोजित तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी फुलारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, जि.प. उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, महेश पाटील, दीपक चाबूकस्वार, संतोष मुक्ता यांची उपस्थिती होती.
या वेळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. उत्का जि.प. शाळेने राबविलेल्या वर्ग सजावट, भाजीपाला बाग, ऑक्सिजन पार्क यासारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात येऊन इतर शाळांनीही बाला उपक्रम राबवावा, असे आवाहन करण्यात आले. सहशिक्षक महादेव खिचडे, सूर्यवंशी यांनी स्वखर्चात व लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन कमलाकर सावंत यांनी केले. आभार सूर्यवंशी यांनी मानले.