निलंगा, अहमदपूर, औराद बाजार समितीत बंद; लातुरात सोयाबीन, देवणी गोवंश संशोधन केंद्राची मागणी
By संदीप शिंदे | Published: September 23, 2023 06:04 PM2023-09-23T18:04:29+5:302023-09-23T18:05:06+5:30
तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
निलंगा/अहमदपूर/ औराद शहाजानी : सोयाबीन संशोधन तसेच देवणी गोवंश संशोधन केेंद्र लातूर येथे स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी निलंगा, अहमदपूर आणि औराद शहाजानी बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. तसेच याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी गोवंश संवर्धन केंद्र परळीला करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळात लातूर जिल्हा मुख्य सोयाबीन उत्पादक असून, देवणी गोवंशही लातूर जिल्ह्यातीलच आहे. त्यामुळे ही दोन्ही संशोधन केंद्रे लातूरला करण्यात यावी, या मागणीसाठी व सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी निलंगा, अहमदपूर आणि औराद शहाजानी बाजार समितीत व्यवहार बंद ठेवण्यात आले. तसेच या तिन्ही बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली.
निलंगा येथे अनिल अग्रवाल, दता कोराळे, शिवकुमार निला, दीपक जाधव, अतुल चव्हाण, विजयकुमार दडगे, विवेक बाहेती, राजकुमार मोरे, वैजिनाथ गताटे, विक्रम काथवटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
तर औराद येथे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी, यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सरकार विरोधी घाेषणा देण्यात आल्या. यावेळी नामदेव चाळक, सभापती नरसिंग बिराजदार, सतीश देवणे, अविनाश रेशमे, दिनेश जावळे, अण्णासाहेब मिरगाळे, अनिल आरिकर, कन्हेया पाटील, श्रीहरी मुगळे, राम सगरे, विलास लंगर, अनंत जगताप, राजकुमार जाधव, अमोल रेड्डी, रमेश राठोड, किशोर मोहिते, सुनील खंडागळे, नेताजी भोईबार, आडत व्यापारी अध्यक्ष शिवाजी शिंदे, अशाेक धबाले, सुनील कलगाणे, शालिवान शिंदे, पिचारे आदी उपस्थित होते.
अहमदपूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सभापती मंचकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मद्दे, शिवाजी खांडेकर, प्रा. संतोष रोडगे, माधव पवार, धनराज पाटील, शिवाजी पाटील, रामदास कदम, बालाजी कातकडे, सतीश नवटक्के, नारायण नागमोडे, यशवंत केंद्रे, विलास पवार हंगरगेकर, संदीप चौधरी, अनिकेत फुलारी, लहू बारवाड, दत्ता हेंगणे, संतोष आदटराव, पद्माकर पेंढारकर, गणेश माणे, माऊली देवकत्ते, श्रीकांत मुंढे, शिवा भारती, बसवेश्वर शिलगिरे, निळकंठ परतवाघ, नामदेव कोणे, सुधाकर बालवाड, मुन्ना शेख आदी उपस्थित होते.