बँक कर्मचारी चळवळीत सांस्कृतिक आशय निर्मिती केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:43+5:302021-07-04T04:14:43+5:30
लातूर : मोर्चे, घोषणा, सभा, भाषणे या चौकटीच्या बाहेर जाऊन बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्माण ...
लातूर : मोर्चे, घोषणा, सभा, भाषणे या चौकटीच्या बाहेर जाऊन बँक कर्मचारी चळवळीत बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक आशय निर्माण करुन ही चळवळ लोकाभिमुख केली. नाटक, पथनाट्य या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, असे गौरवोद्गार कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी काढले.
बॅंकेत प्रदीर्घ सेवा बजावून बाळकृृष्ण धायगुडे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होते. यावेळी शाखाधिकारी अरविंद वाघमारे, प्रफुल्ल वाघमारे, बँक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे नेते राजेंद्र दरेकर, आर. बी़. इबुतवार, अंजली स्वामी, उमेश कामशेट्टी, प्रशांत धामणगावकर उपस्थित होते.
३५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे बाळकृष्ण धायगुडे यांनी सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप उमटवली. पुरोगामी विचारांचे बाळकृष्ण धायगुडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून, बहारदार सूत्रसंचालन ही त्यांची ख्याती आहे. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अॅड. उदय गवारे, प्रा. सुधीर अनवले, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, उत्तम होळीकर, दीपक माने, उदय मोरे, प्रदीप भोकरे, रवी आघाव, निर्भय कोरे, दिलीप सोरडगे, नागसेन कामेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शाखाधिकारी अरविंद वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना कसबे यांनी केले तर हेमंत हिरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी लांडगे, कविता सरातीया, विनय पाटील, वर्षा कोकाटे, खंडू बागल, महालिंग स्वामी, पुष्पा गरड यांनी सहकार्य केले.