आता व्हा आत्मनिर्भर; १४४ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:17+5:302021-09-04T04:24:17+5:30
वैयक्तिक तसेच गट शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्थांना सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी बँक कर्जाशी निगडित प्रकल्प खर्चाच्या ३५ ...
वैयक्तिक तसेच गट शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्थांना सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी बँक कर्जाशी निगडित प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के बाँडिग व बाजारपेठ सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अनुदान देय आहे. योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने मंजूर केले जाणार आहे. अधिक रकमेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले जाणार आहेत. या योजनेमुळे नवउद्योजकांना चालना मिळणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट...
लातूर - १९
रेणापूर - १२
औसा - २७
निलंगा - १५
शि.अनंतपाळ ७
उदगीर - १९
अहमदपूर - १५
चाकूर - १२
जळकोट ५ ६
देवणी - ६
शेतकरी, गटांना होणार फायदा...
स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्थांना अर्ज करता येणार आहेत. केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना राबविली जात आहे. तालुकानिहाय लाभार्थ्यांचे उद्दिष्टे देण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र अर्जधारकांना लाभ देण्यासाठी प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे समन्वयक माधव निटुरे यांनी सांगितले.
कोणाला घेता येणार लाभ...
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत वैयक्तिक शेतकरी, स्वयंसहाय्यत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था आदी घटक योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना १० लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची या योजनेतंर्गत तरतूद आहे. या योजनेमुळे अनेकांना सूक्ष्म उद्योगासाठी मदत होणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट...
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेंतर्गत जिल्ह्याला दहा तालुक्यांकरिता १४४ लाभार्थी एवढे उद्दिष्ट मिळाले आहे. याकरिता राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कामकाज केले जात आहे.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी