ऑटो परत देण्याच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:04+5:302021-09-03T04:21:04+5:30

पिकअपची दुचाकीला धडक; एकजण जखमी लातूर : नांदेड रोडवरील कोष्टगाव परिसरात वाहन हयगयीने चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक दिल्याची घटना ...

Beaten for auto return reasons | ऑटो परत देण्याच्या कारणावरून मारहाण

ऑटो परत देण्याच्या कारणावरून मारहाण

Next

पिकअपची दुचाकीला धडक; एकजण जखमी

लातूर : नांदेड रोडवरील कोष्टगाव परिसरात वाहन हयगयीने चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक दिल्याची घटना घडली. याबाबत कडाजी त्रिंबक तेलंगे (रा. प्रकाश नगर, लातूर) यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जहागीरदार करीत आहेत.

घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास

लातूर : शहरातील मंठाळे नगर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची (एमएच २४ एई ००२३) चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत रविशंकर बसवराज पंचाक्षरी (रा. हमाल गल्ली, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत.

मालवाहू पिकअपची जीपला धडक

लातूर : रेल्वे स्टेशन चौक ते नवीन रेणापूर नाका जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर भरधाव वेगातील मालवाहू पिकअप(एमएच २४ एयू ४२११)ने जीपला (एमएच ४४ - ९३७५)समोरून जोराची धडक दिली. यात जीपचे नुकसान झाले. याबाबत चंद्रकांत एकनाथ नाचबळ (रा. गंगथडी, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू चालकाविरुद्ध(एमएच २४ एयू ४२११) या गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

दवाखान्यासमोरून कारची चोरी

लातूर : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डायग्नोस्टिक सेंटरसमोर पार्किंग केलेल्या (एमएच २४ एडब्ल्यू ००५२) कारची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सचिन विनायक तांबरे (रा. मंजुळा नारायणसदन थोडगा रोड, लेक्चर कॉलनी अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैतलवाड करीत आहेत.

Web Title: Beaten for auto return reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.