विहिरीत हिस्सा देण्याच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:12 AM2021-02-19T04:12:04+5:302021-02-19T04:12:04+5:30

ऑटोत बसल्याच्या कारणावरून मारहाण लातूर : ऑटोत बसल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना हाडगा-उमरगा येथे घडली. याबाबत डिगंबर मधुकर वाघमारे ...

Beaten for the reason of giving a share in the well | विहिरीत हिस्सा देण्याच्या कारणावरून मारहाण

विहिरीत हिस्सा देण्याच्या कारणावरून मारहाण

googlenewsNext

ऑटोत बसल्याच्या कारणावरून मारहाण

लातूर : ऑटोत बसल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना हाडगा-उमरगा येथे घडली. याबाबत डिगंबर मधुकर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात ऋषी धनराज वाघमारे व अन्य दोघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मला पैसे दे म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारले

लातूर : बँड वाजवलेल्या मजुरीचे पैसे आणण्यासाठी जात असताना मदनसुरी येथे चौकात दोघांनी सुनील व्यंकट शिंदे (रा. मदनसुरी, ता. निलंगा) यांना मला पैसे दे म्हणून विनाकारण मारहाण केली. दुकानातील एक किलोचा बाट आणून उजव्या हाताने भुवईवर मारला. तसेच डोक्यात मारून जखमी केले, तुला खलास करून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून ओम अंकुश कांबळे व अन्य दोघांविरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. गोळे करीत आहेत.

फुलाची कुंडी डोक्यात मारून केले जखमी

लातूर : फुलाची कुंडी डोक्यात मारून एकाला जखमी केल्याची घटना सातफुटी रोड लातूर येथे घडली. याबाबत गांधी चौक पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले, तू आमच्या भांडणामध्ये का पडत आहेस. तू भांडणात पडू नको, असे म्हणून फिर्यादी महेबूब महंमदअली शेख (रा. अन्सार कॉलनी, गल्ली नं. १) यांना अरबाज चाऊस व अन्य दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फुलाची कुंडी डोक्यात व पाठीत मारून जखमी केले. तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. याबाबत महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये अरबाज चाऊस व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Beaten for the reason of giving a share in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.