लिंगायत महासंघाच्या वतीने खरोश्यात बसव मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:10+5:302020-12-04T04:58:10+5:30
: लिंगायत महासंघाच्या वतीने खरोसा येथे बसव मेळावा बुधवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी औसा पंचायत समितीचे माजी उपसभापती विठ्ठलराव खरपडे ...
: लिंगायत महासंघाच्या वतीने खरोसा येथे बसव मेळावा बुधवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी औसा पंचायत समितीचे माजी उपसभापती विठ्ठलराव खरपडे होते.
यावेळी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, जिल्हाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. काशीनाथ राजे, जिल्हा सहसचिव माणिकप्पा कोकणे, किसन कोलते, एन.आर. स्वामी, अशोक काडादी, राजेश्वर पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्रा. सुदर्शन बिरादार म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत समाजापुरतेच मर्यादित कार्य केले नाही, तर त्यांनी समाजातील अठरापगड जातीतील सर्वांसाठी कार्य केले. त्यांनी कुठलाही भेदभाव मानला नाही. त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिले. त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. त्यामुळेच त्यांची जगाला ओळख होती. यावेळी प्रा. डॉ. काशीनाथ राजे, किसन कोलते, एन.आर. स्वामी यांची भाषणे झाली.
यावेळी गोरोबा क्षीरसागर, वार्षिकेत डोके, शिवाजी तोडकर, प्रा. तानाजी टिके, संजय पाटील, अजय साळुंके, सिद्धेश्वर डोके, अशोक खरपडे, धोंडीराम बिराजदार, सतीश माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी भातमोडे यांनी केले. संभाजी खरपडे यांनी आभार मानले.