Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:57 PM2018-09-10T14:57:13+5:302018-09-10T14:57:36+5:30

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Bharat Bandh: Latur district closed | Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध

Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध

Next

 लातूर - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर शहरात शाळा-महाविद्यालय वगळता व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजल्यापासून बंदचे आवाहन केले. बाहुबली व कटप्पाच्या वेशभुषा परिधान करुन कार्यकर्ते बंद आंदोलनात सहभागी झाले होते. लातूर शहराचे आमदार अमित देशमुख, पक्ष निरीक्षक भा. ई. नगराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख,  माजी आमदार वैजनाथ शिंदे, अ‍ॅड. दीपक सूळ, राजकुमार जाधव, विक्रांत गोजमगुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, संजय निलेगावकर, जयचंद भिसे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. शिवाजी चौक, नंदीस्टॉप, आदर्श कॉलनी, मित्रनगर, गांधी चौक, मिनीमार्केट येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, शिवाजी चौक येथे आंदोलनाची सांगता करण्यात आली. 
औसा शहर व परिसरातही शांततेत बंद झाला. इंधन दरवाढीच्या विरोधात शहरातून सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी रॅली काढून दरवाढीचा निषेध नोंदविला. चाकूर तालुक्यातील जानवळ येथेही बंदलाही उत्स्फुर्तला पाठिंबा मिळला. अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथेही बंद पाळण्यात आला. उदगीर शहर व परिरातील शाळा-महाविद्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शिवाजी चौकातून रॅली काढून राज्य व केंद्र सरकारचा निषेध  नोंदविण्यात आला.  चाकूर शहर बंदला प्रतिसाद मिळाला. अहमदपूर शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. चाकूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ आणि लातूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी ३ वाजेनंतर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले.

एक ही भूल..कमल का फूल...
पेट्रेल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली. एकही भूल.. कमल का फूल...असे फलक लावून केंद्र सरकारचा निषेध केला.

Web Title: Bharat Bandh: Latur district closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.