लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

By राजकुमार जोंधळे | Published: October 12, 2022 05:34 PM2022-10-12T17:34:28+5:302022-10-12T17:35:47+5:30

दरोडेखोरांनी सव्वा दाेन काेटींची राेकड, ७३ लाखांचे साेने पळविले

Biggest robbery ever in Latur; 3 crore cash and jewelery looted at pistol point | लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

googlenewsNext

लातूर : चाकूचा आणि पिस्टलचा धाक दाखवत लातूर शहरातील कातपूर राेडवरील एका बंगल्यावर पाच जणांच्या टाेळीने सशस्त्र दराेडा टाकल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. दराेडेखाेरांनी तब्बल सव्वा दाेन काेटींची राेकड आणि ७३ लाखांचे साेने पळविले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लातूर जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सर्वात माेठा दराेडा असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी सांगितले, राजकमल अग्रवाल हे लातुरातील माेठे व्यापारी आहेत. त्यांचा बंगला कातपूर राेडवरील कन्हैयानगर, रामचंद्र नगरात बंगला आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दराेडेखाेर त्यांच्या घरात घुसले. घरात प्रवेश करताच राजकमल अग्रवाल यांना झाेपेतून जागे करण्यात आले. त्यांच्या गळ्याला चाकू लावला, पिस्टलसह धाररदार हत्याराचा धाक दाखविण्यात आला. यावेळी घरात अग्रवाल, पत्नी, मुलगा आणि सून असे चार जण हाेते.

दराेडेखाेरांनी अग्रवाल कुटुंबाला धमकाव त्यांच्याकडील माेबाइल काढून घेतले. राजकमल अग्रवाल यांच्याकडून कपाट आणि लाॅकरच्या चाव्या काढून घेत सिनेस्टाईलपद्धतीने दाराेडा टाकला. यावेळी एकूण सव्वादाेन काेटींची राेकड आणि ७३ लाखांचे साेने असा जवळपास तीन काेटींचा मुद्देमाल पळविला. दराेडेखाेरांनी जाताना घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून वायफायचा बाॅक्स नेला. आम्ही बराच वेळ इथे थांबणार आहाेत, असे दराेडेखाेरांनी बजावले. काहीही हालचाल करु नका, आरडाओरडा करु नका, काेणाशीही संपर्क साधू नका, असे धमकावले. हे दराेडेखाेर २५ ते ३० वयाेगटातील असून, ते मराठी भाषा बाेलत हाेते, असे पाेलिसांनी सांगितले.

श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण...
पहाटे सव्वातीनच्या सुमारास दराेडेखाेरांनी घर साेडताच, अग्रवाल यांनी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठाेपाठ श्वानपथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देवून पाहणी केली. दराेड्यात तब्बल तीन काेटींचा मुद्देमाल पळविल्याचे दुपारपर्यंत समाेर आले.

शांत डाेक्याने डाकला दराेडा...
पाच जणांच्या टाेळींने हा सशस्त्र दराेडा अतिशय प्लॅनिंगने, शांत डाेक्याने टाकल्याचे समाेर आले आहे. या बंगल्यावर आणि अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवूनच हा दराेडा टकला असावा. श्वान पथक घटनास्थळावरच घुटमळाल्याने दराेडेखाेर एखाद्या वाहनातून पसार झाले असावेत, असाही अंदाज पाेलिसांना व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वात माेठ्या दराेड्याचा तपास करण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.

Web Title: Biggest robbery ever in Latur; 3 crore cash and jewelery looted at pistol point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.