लातूरात भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्रमक; प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध
By हणमंत गायकवाड | Published: January 4, 2024 05:52 PM2024-01-04T17:52:08+5:302024-01-04T17:52:53+5:30
भाजपासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
लातूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी लातुरात करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या संदर्भात आक्षेपहार्य वक्तव्य केले. त्याचा निषेध लातूर येथे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले. यावेळी भाजपासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनात गुरुनाथ मगे, रवी सुडे, दिग्विजय काथवठे, प्रवीण सावंत, शीरिष कुलकर्णी, गणेश गोमचाळे, प्रेम मोहिते, गजेंद्र बोकन, राहुल भुतडा, आकाश बजाज, संतोष तिवारी, शीतल औसेकर, शीतल पाटील, पतंगे, ऋषिकेश इगे, विजय वर्मा, ऋषी जाधव,पांडुरंग बोडके,अरुण जाधव,योगेश घोरपडे,किशोर कवडे आदींचा सहभाग होता.