लातूर जिल्ह्यातील 10 पैकी 7 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2017 04:24 PM2017-03-14T16:24:09+5:302017-03-14T16:24:33+5:30

लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी मंगळवारी झाल्या. १० पैकी ७ पंचायत समितीत

BJP flag on 7 out of 10 Panchayat Samitis in Latur district | लातूर जिल्ह्यातील 10 पैकी 7 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

लातूर जिल्ह्यातील 10 पैकी 7 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.14 - लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी मंगळवारी झाल्या. १० पैकी ७ पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर ३ पंचायत समितीत काँग्रेसचा सभापती झाला आहे. औशात काँग्रेसला मनसेने साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेचा उपसभापती झाला आहे. लातूर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसने सभापती व उपसभापतीपद मिळविले आहे. 
 
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने भरघोस यश संपादन केले. ७ पंचायत समितीत निर्विवादपणे वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे चाकूर, अहमदपूर, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर पंचायत समित्यांत भाजपाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर लातूर, औसा व जळकोट पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती झाले असून, औशात काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. मनसेच्या इंजिनने हाताला साथ दिल्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेला उपसभापती पद देण्यात आले आहे. 
 
भाजपाचे सभापती व उपसभापती...
 
निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदी अजित माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे,
 
शिरूर अनंतपाळ पं.स.च्या सभापतीपदी वर्षा भिक्का, उपसभापती डॉ. नरेश चलमले, 
 
चाकूर- सभापती सुनीता डावरे, उपसभापती वसंत डिगोळे, 
 
अहमदपूर- सभापती अयोध्याताई केंद्रे, उपसभापती मंगलाबाई खंदाडे, 
 
रेणापूर- सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, देवणी- सभापती सत्यवान कांबळे, उपसभापती शंकर पाटील, 
 
उदगीर- सभापती सत्यकला गंभिरे, उपसभापती रामदास बेंबडे यांची निवड करण्यात आली. 
 
लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या शीतल फुटाणे, उपसभापतीपदी दत्ता शिंदे, 
 
जळकोट- सभापतीपदी व्यंकटराव केंद्रे, उपसभापती स्वाती केंद्रे. 
 
औसा पं.स. सभापतीपदी काँग्रेसचे संजय कदम, तर उपसभापतीपदी मनसेच्या रेखाताई नागराळे यांची निवड करण्यात आली आहे. 
 
औसा, लातुरात काँग्रेसला टेकू... 
 
औसा व लातूर पंचायत समितीत बहुमतासाठी काँग्रेसला इतर पक्षांचा आधार घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड होते. लातूर पंचायत समितीत काँग्रेसचे १०, भाजपाचे ७ व राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. बहुमतासाठी ११ सदस्य आवश्यक होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला. तर औसा पंचायत समितीत १८ पैकी ९ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. सभापतीपदासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. त्यामुळे मनसेला उपसभापतीपद देऊन काँग्रेसने सभापतीपद मिळविले आहे. 

Web Title: BJP flag on 7 out of 10 Panchayat Samitis in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.