कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:39 PM2020-10-07T17:39:46+5:302020-10-07T17:40:16+5:30
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बुधवार दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर, देवणी, औसा, शिरुर अनंतपाळ येथे आंदोलन करण्यात आले़.
देवणी : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बुधवार दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर, देवणी, औसा, शिरुर अनंतपाळ येथे आंदोलन करण्यात आले़.
कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशात कुठेही विक्री करता येईल़. एक शेतमाल, एक भाव मिळणार असून आडत बाजारच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे़. केंद्र सरकारच्या या विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने देवणी येथील मार्केट कमिटीत भाजपाच्या वतीनेआंदोलन करण्यात आले़
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रशांत पाटील, नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, मार्केट कमिटीचे सभापती बालाजी बिरादार, भाजपा तालुकाध्यक्ष मनोहर गरिबे, शहराध्यक्ष अटल विश्वास धनुरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, हावगीराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.