काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची आघाडी

By admin | Published: October 23, 2014 12:10 AM2014-10-23T00:10:45+5:302014-10-23T00:15:56+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर

BJP's lead in the citadel of Congress | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची आघाडी

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची आघाडी

Next


व्ही़एसक़ुलकर्णी ,उदगीर
उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीचेच प्रभूत्व आहे़ तरीही मागील लोकसभा अन् आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारुन काँग्रेस-राकाँला पिछाडीवर नेले आहे़
उदगीर पालिकेत ३३ पैकी २६ नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ जिल्हा परिषदेचे ६ पैकी ५ गट व पंचायत समितीचे १२ पैकी १० गण काँग्रेसकडे आहेत़ जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समितीही काँग्रेसकडेच आहे़ दुसरीकडे जळकोट तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे़ ३ पैकी २ जिल्हा परिषदेचे गट व ६ पैकी ४ पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ या दोन्ही तालुक्यात भाजपाच्या वाट्याला केवळ १ जिल्हा परिषद गट व ३ पंचायत समिती गण आले आहेत़ स्थानिक स्वराज्य संस्थांत इतकी सुमार कामगिरी करणाऱ्या भाजपाला मतदारांनी मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र भरभरुन मदत केली आहे़
२००७ साली झालेल्या जि़प़ व पं़स़ निवडणुकीत उदगीर तालुक्यातून सर्वाधिक मते राकाँला २४०१० इतकी होती़ भाजपाला १५७७३ तर काँग्रेसला ११७३२ मते पडली होती़ दरम्यान, २०१२च्या निवडणुकांमध्ये ४०१७३ मते घेऊन काँग्रेस एक नंबरवर राहिली़ दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाला २३४८० तर घसरण झालेल्या राकाँला २०२४१ मते होती़ जळकोट तालुक्यातही भाजपा पिछाडीवरच राहिली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थेत मतांची अशी समीकरणे असतानाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून ४७ हजार मतांची आघाडी भाजपाला मिळाली़ उदगीर शहरातून ४९३३ मताधिक्य लोकसभेला होते़ यावेळी युती तुटल्याने त्याचा फटका बसून विधानसभेत २२१७ मताधिक्य भाजपाला मिळाले़ उदगीरमध्ये भाजपाला १४९८८, राकाँला १२७७३ तर काँग्रेसला ६४२० मते पडली आहेत़ जळकोट शहरातून भाजपाला २९१ मतांची आघाडी मिळाली़ तर तालुक्यातून १९२१ मतांची आघाडी मिळाली़ लोकसभेला मतदारसंघातील जायभायची वाडी येथील केंद्रावर काँग्रेसला केवळ ३ मते पडली होती़ तुलनेने भाजपाला मात्र ३३२ मते मिळाली़ विधानसभेला मतदारसंघातील सर्वाधिक मतदानाचा टक्का जायभायची वाडीच्या केंद्राचाच राहिला़ यावेळी मात्र काँग्रेसला येथून १७३ मते मिळाली़

Web Title: BJP's lead in the citadel of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.