पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:45 AM2018-08-24T01:45:38+5:302018-08-24T01:46:19+5:30

६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार

BJS's determination to drought-free five districts: Shantilal Muthatha | पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

Next

लातूर : भारतीय जैन संघटनेने जूनअखेरपर्यंत राज्यातील बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाची कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविला जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. किल्लारीतील भूकंपानंतर तेथील १० हजार नागरिकांना दररोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महाराष्ट्र सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतजमीन सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या.
२०१८ च्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जेसीबी मशीन भाड्याने घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनचा ८ लाख ५२ हजार तास वापर झाला. त्यामुळे ५ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढली. ३ मार्च २०१८ रोजी बुलडाणा येथे १३४ जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत ५० लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात दुष्काळ मुक्ती अभियानचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी किल्लारी येथे होईल.

शासनाकडून डिझेल पुरवठा
लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सेवाभावी संस्था, सीएसआर कंपन्यांच्या सहकार्यातून कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा करारही झाला आहे. भारतीय जैन संघटना जेसीबी, पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेवेल. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे मॉडेल तयार करून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

Web Title: BJS's determination to drought-free five districts: Shantilal Muthatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.