धामणगावच्या शिबिरात १०३ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:21+5:302020-12-25T04:16:21+5:30
ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी ...
ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी राज्यस्तरीय ग्राम स्वराज संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. गुरूवारी धामणगाव येथे राज्यातील आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर पेरे पाटील आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे शिष्य महंत विवेक शास्त्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आयोजित शिबिरात १०३ जणांनी रक्तदान केले. तसेच निराधारांना रजई, फर्निचरचे वाटप करून अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नामफलकाचे अनावरण...
सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान झाले. त्यांनी अत्यंत मार्मिक विनोदी शैलीत ग्राम स्वराज कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यास तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांची उपस्थिती होती. भगवानगडाचे महंत ह.भ.प विवेक शास्त्री यांच्या हस्ते ग्राम स्वराज संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
***