निलंग्यात २०१ पोलिसांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:37+5:302021-02-05T06:22:37+5:30

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सपोनि. डी.एस. ढोणे, पोउपनि. एच.एम. पठाण, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रारंभी ...

Blood donation of 201 policemen in Nilanga | निलंग्यात २०१ पोलिसांचे रक्तदान

निलंग्यात २०१ पोलिसांचे रक्तदान

Next

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सपोनि. डी.एस. ढोणे, पोउपनि. एच.एम. पठाण, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रारंभी तानाजी नावाडे, डॉ. एस.आर. जाधव, ज्ञानेश्वर बरमदे, अयुब सौदागर यांनी रक्तदान केले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उपअधीक्षक दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात पोलीस कर्मचारी एम.एन. महानवर, एम.एम. बेग, एल.एम. नागटिळक, एम.व्ही. शिंदे, ए.एम. सातपोते, प्रणव काळे, एस एस. शिंदे, पी.आर. सूर्यवंशी, एस.बी. सिंदाळकर, व्ही.व्ही. अंबर, एच.एस. पडिले, वाय.बी. मरपल्ले, के.ई. शेख, ए.एम. शेख, के.व्ही. सूर्यवंशी, एस.आर. कोहाळे, यू.बी. कुदाळे, एच.एस. मोमले, डी.एस. थोटे, बी.एन. मस्के, बी.एल. जगताप आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी स्वराज्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता शाहीर, डॉ. लालासाहेब देशमुख, गोविंद इंगळे यांचा पोलीस ठाण्यातर्फे उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भालचंद्र ब्लड बँकेचे रक्त संक्रमण अधिकारी योगेश गवसाने, दिगंबर पवार, किशोर पवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 201 policemen in Nilanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.