शिवसेनेच्यावतीने रक्तदान, काेविड योध्द्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:47+5:302021-08-01T04:19:47+5:30
देवणी : शिवसेना व युवा सेनेच्यावतीने येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कोविड योद्ध्यांचा गौरवही करण्यात ...
देवणी : शिवसेना व युवा सेनेच्यावतीने येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कोविड योद्ध्यांचा गौरवही करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख शिवाजी माने होते. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा महिला संघटक डॉ. शोभाताई बेंजरगे, युवा सेना संपर्कप्रमुख सुरज दामरे, जिल्हाप्रमुख ॲड. राहुल मातोळकर, डॉ. नीळकंठ सगर, डॉ. दिलीप गुरमे, डॉ. ज्ञानोबा चिटुपे, तालुकाप्रमुख पंडित अण्णा भंडारे, रणजित दोडके, बालाजी बिरादार, संताजी पाटील भोपणीकर, कृष्णा इंगोले, आनंद जीवणे, दीपक बेळकोणे, यशवंत ठाकरे, पंढरी जोळदापके, कृष्णा पिंजरे, लक्ष्मण रणदिवे, दत्ता बिरादार, कृष्णा घोंगरे, अमोल भोसले, परमेश्वर बिरादार, बालाजी बिरादार, विशाल बाबरे, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी रक्तदानासह कोविड काळात ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, पत्रकारांनी उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश सुडे, संजय बिरादार, लक्ष्मण बिरादार, गणपत पाटील आदींनी परिश्रम घेतले.