श्री केशवराज मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:02+5:302021-07-22T04:14:02+5:30
अंनिसच्यावतीने रक्तदान शिबिर लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ईदनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अंनिसच्या महिला आघाडीच्या राज्य ...
अंनिसच्यावतीने रक्तदान शिबिर
लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ईदनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अंनिसच्या महिला आघाडीच्या राज्य सहकार्यवाह रुक्साना मुल्ला, रणजित आचार्य, देवराज लंगोटे यांनी रक्तदान केले. अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, अरमान सय्यद, डॉ. सितम सोनवणे, शिवानी गायकवाड, सरिता गायकवड आदींची उपस्थिती होती.
गुरूपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन वारी उत्सव
लातूर : श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व प. पू. कानिकनाथ महाराज यांच्यावतीने भक्तांसाठी दरवर्षी गुरूपौर्णिमा सोहळा साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे गुरूपौर्णिमा वारी उत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. २३ जुलैरोजी सकाळी ८.३० वाजता हा गुरुपूजन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महादेव सोनवणे, साक्षी गोजमगुंडे, धनश्री जगताप, बालाजी जाधव हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. या सर्व गुणवंतांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रशांत पटणे, मुख्याध्यापक आर. बी. देशमुख, प्रा. श्रीकांत बिडवे, पर्यवेक्षक सी. व्ही. मेटे यांच्याहस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डी. एस. राठोडकर यांनी केले, तर आभार पी. जी. पटणे यांनी मानले.
घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत २०२१-२२ साठी नवीन वसाहत योजना, वैयक्तिक घरकुल योजना, धनगर समाजासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करून लाभ घेण्यास प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्तांनी केले आहे.
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी
लातूर : मातोश्री कलावत प्रतिष्ठान संचलित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये ऑनलाईन पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका वर्षा लिंबुटे यांनी पांडुरंग नामाचा जयघोष करीत अभंग सादर केला. दिंडीच्या कार्यक्रमात पालखीचे पूजन श्रीकृष्ण लाटे, प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख यांच्याहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मकरंद सबनीस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
लातूर : जेएसपीएम, लातूरद्वारा संचलित मजगेनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून, तीन विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण घेतले आहेत. २३ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे असून, ४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहेत. या विद्यार्थ्यांची कौतुक संस्थेच्यावतीने करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील- कव्हेकर, कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील-कव्हेकर, समन्वयक नीळकंठराव पवार आदींच्याहस्ते सत्कार करण्यात आला.