उदगीरात आज महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:09+5:302021-07-05T04:14:09+5:30
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोेरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने हे राहणार आहेत. सध्या ...
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोेरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने हे राहणार आहेत. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारसंघांतील युवक, कार्यकर्त्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करीत राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या काळात उदगीरकरातील नागरिक, सामाजिक संस्थांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. संकटाच्या काळात अन्नदान, गरजूंना मदत केली आहे. उदगीरकर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देण्यासाठी पुढे असतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सातत्याने प्रयत्न करून बहुतांश सुविधा उपलब्ध केल्या आहेत. प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांनीही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विक्रमी रक्तदान करावे, असे आवाहनही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.