गोविंदलाल जोशी महाविद्यालयात रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:36+5:302020-12-23T04:16:36+5:30
मंडळ सचिव तेलंग यांनी स्वीकारला पदभार लातूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरच्या विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग ...
मंडळ सचिव तेलंग यांनी स्वीकारला पदभार
लातूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरच्या विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी सांगली येथे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होती. जि.प.च्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांच्याकडे लातूर विभागीय मंडळाच्या सचिवपदाची अतिरक्त जबाबदारी होती. त्यांची पुणे येथे विभागीय शिक्षण उपसंचालकपदी बदली झाल्याने सुधाकर तेलंग यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रबी पिकांवर अळींचा प्रादुर्भाव
लातूर - जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, कृषी विभागाच्या वतीने २ लाख २७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. त्या तुलनेत ३ लाख २७ हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रबी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या थंडी सुरू झाली असून, हे वातावरण पिकांसाठी पोषक आहे. अळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड
लातूर - भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने विज्ञान प्रदर्शन होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधक, शास्त्रज्ञ बनविण्यासाठी मदत होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या बदलाची माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
खाडगाव स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम
लातूर - शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने खाडगाव स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव-लोंढे, ऋषिकेश दरेकर, गंगाधर पवार, शिवशंकर सुफलकर, महेश गेल्डा, सीताराम कणजे, युगा कनामे, निकिता कावळे, डी.एम. पाटील, गोविंद शिंदे, प्रमोद निपाणीकर, डॉ. जयंत पाटील, सुहास पाटील, सूरज पाटील, प्रमोद वरपे, कृष्णा वंजारे, विजयकुमार कठारे, तौसिफ सय्यद आदी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट
लातूर - लातूर शहर मनपा सफाई कामगार शिष्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सफाई कामगार संघटनेचे बळीराम कांबळे, सतीश साठे, शिला सरवदे, सुमन सिरसाठ, संदीप भुताळे, प्रभाकर गायकवाड, शारदा अर्धापुरे, निलेश शिंदे, धनशिला बनसोडे, मिलिंद सूर्यवंशी, मीना अर्जुने यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी ॲड. दीपक सूळ, ॲड. किरण जाधव, रविशंकर जाधव, ॲड.फारुख शेख उपस्थित होते.
राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहनिमित्त कार्यक्रम
लातूर - तेलंगणा ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने राज्यस्तरीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी डी. प्रभाकरराव, संदीपकुमार, बी.के. सुमंगला, केदार खमितकर यांची उपस्थिती होती. औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात ऊर्जा संरक्षणात कार्य केलेल्या संस्थांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.