निलंग्यात रक्तदान, आरोग्य शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:16+5:302021-01-09T04:16:16+5:30
निलंगा येथे शनिवारी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून उद्योजक महिलांचे स्टॉल, प्रदर्शन व आनंदनगरी कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...
निलंगा येथे शनिवारी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून उद्योजक महिलांचे स्टॉल, प्रदर्शन व आनंदनगरी कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वा. पर्यंत सर्वरोग निदान शिबीर होणार असून त्यात मधुमेह, रक्तदाब, रक्तगट तपासणी होणार आहे.
या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ. हंसराज भोसले, अर्चना मोरे, वैशाली इंगळे, अंजली सूर्यवंशी, नम्रता हाडोळे, राजेश्री शिंदे, आर.के. नेलवाडे, मोहन घोरपडे, गणेश गायकवाड, डॉ. एस.एस. शिंदे, डॉ. उद्धव जाधव, डॉ. सचिन बसुदे, डॉ. लालसाहेब देशमुख, डॉ. नितीन चांदुरे, उत्तम शेळके, भास्कर यादव, प्रा. विश्वनाथ जाधव, तिरुपती शिंदे, कुमोद लोभे, शरद साळुंखे, विनोद सोनवणे, विवेक पाटील, अरुण पाटील आणि मराठा सेवा संघाची निलंगा शाखा, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, वीरभगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.