प्रवाशांसाठी मुरुड स्थानकात स्वखर्चातून घेतला बोअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:58+5:302021-01-25T04:19:58+5:30
अध्यक्षस्थानी रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यशवंतराव नाडे होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी ...
अध्यक्षस्थानी रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यशवंतराव नाडे होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे लातूर विभागप्रमुख सचिन क्षीरसागर, वाहतूक नियंत्रक जाफर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नागटिळक, स्थानक नियंत्रक बी.एच. देवकर उपस्थित होते. येथील सामाजिक संस्था, प्रतिष्ठाने, व्यापारी, नागरिक व मित्रमंडळांनी पाटील यांचा सत्कार केला.
तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ४५ जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. मुरुड ग्रामपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेस ४२ पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. चव्हाणवाडी मुरुड येथे रग वाटप करण्यात आले. तर नरसिंह चौकात सिमेंटचे बाक बसविण्यात आले. यशस्वीतेसाठी गणेश सापसोड, विशाल शिंदे, संतोष नाडे, सौरभ शिंदे, योगेश पुदाले, शिवाजी चिकरुडकर, महादेव मस्के, रामदास शिंदे यांनी सहकार्य केले.