बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, आत्महत्या की घातपात?

By संदीप शिंदे | Published: January 6, 2024 11:48 AM2024-01-06T11:48:03+5:302024-01-06T11:49:21+5:30

सायबर सेल व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच घटनेचा उलगडा होणार

Body of missing youth found in well, suicide or accident? | बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, आत्महत्या की घातपात?

बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, आत्महत्या की घातपात?

- बालाजी कटके
रेणापूर ( जि. लातूर ) :
रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील बेपत्ता तरुणाचा स्वतःच्या शेता शेजारील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अभय अनुरथ सूर्यवंशी ( २३ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही आत्महत्या की घातपात यावर कामखेडा गावात चर्चेला उधाण आले आहे. 

पोलिसांनी सांगितले, कामखेडा येथील अभय अनुरथ सुर्यवंशी (वय २३) हा रेणापूरातील शिवाजी महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षांत शिकत असून, ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मी कॉलेजला जात आहे, असे सांगून तो घरुन गेला. मात्र तो परत न आल्याने कुटूंबियांनी शोध घेतला. तसेच वडील अनुरथ सुर्यवंशी यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार दाखली केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार पांचाळ तर कर्मचारी सारूळे तपास करीत होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अभयचे चुलते अशोक सुर्यवंशी यांना मुलाच्या शेताशेजारी असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती रेणापूर पोलीस व बीट अंमलदार यांना दिल्यानंतर पंचनामा करुन रेणापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री रेणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहे एन.आर. सारोळे करीत आहेत.

सायबर सेलकडून अहवाल येणार...
अभय सुर्यवंशी हा फोनवर बोलत होता. त्यामुळे याची अधिक माहिती सायबर सेलकडून मागविण्यात आली आहे. सायबर सेल व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच घटनेचा उलगडा होणार असल्याचे पोह एन.आर. सारोळे यांनी सांगितले.

Web Title: Body of missing youth found in well, suicide or accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.