लाचखोर अभियंता जाळ्यात
By Admin | Published: April 12, 2015 12:55 AM2015-04-12T00:55:00+5:302015-04-12T00:55:00+5:30
लातूर : मजूर संस्थेच्या बिलाचे बक्षीस व कार्यालयात ठेवलेले डिपॉजीट रिलीज करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी दुपारी
लातूर : मजूर संस्थेच्या बिलाचे बक्षीस व कार्यालयात ठेवलेले डिपॉजीट रिलीज करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शनिवारी दुपारी लघुसिंचन जलसंधारण विभागातील अभियंत्यास लातूरच्या महेबुब नगर भागात रंगेहात पकडले़
अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथील पाझर तलाव व सांडव्याचे काम २०१४ मध्ये मांडूरकी येथील महात्मा फुले मागासवर्गीय मजूर संस्थेने केले़ ५ लाख ३८ हजार रुपयांच्या या कामाचे बक्षीस व कार्यालयाकडे ठेवलेले ९० हजार रुपयांचे डिपॉजीट रिलीज करण्यासाठी शाखा अभियंता रहिमोद्दीन कमरोद्दीन कायमी (५७) यांनी ८० हजार रुपयांची लाच गौस शेख यांच्याकडे मागितली़ तडजोडीनंतर २५ हजार रुपयांची लाच राहत्या घरी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले़ याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे़ (प्रतिनिधी)