बहिणीच्या छळाने भावांचा राग अनावर; अद्दल घडविण्यासाठी केलेल्या मारहाणीत मेहुण्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:39 PM2022-02-28T18:39:01+5:302022-02-28T18:39:24+5:30

लातुरातील घटनेट चारजणांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

brothers saw sister's harassment, in temper they killed brother in law while beating | बहिणीच्या छळाने भावांचा राग अनावर; अद्दल घडविण्यासाठी केलेल्या मारहाणीत मेहुण्याचा मृत्यू

बहिणीच्या छळाने भावांचा राग अनावर; अद्दल घडविण्यासाठी केलेल्या मारहाणीत मेहुण्याचा मृत्यू

googlenewsNext

लातूर : बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटी येथे बहिणीला छळणाऱ्या मेहुण्याला अद्दल घडविण्याच्या उद्देशाने चाैघांनी काठी, लाकडाने जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, साेमवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दाेघा मेहुण्यांसह अन्य दाेघांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, गणेश चटनाळे, बसवराज चटनाळे यांच्या बहिणीचा विजयकुमार हणमंतप्पा पिल्ले (वय ३७) याच्याशी १५ वर्षांपूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला हाेता. दरम्यान, बहिणीला मेहुण्याने काही दिवस चांगले नांदविले. त्यांना दाेन अपत्य झाली. त्यानंतर क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून, छाेट्या-छाेट्या गाेष्टींवरून विजयकुमार हा पत्नीचा छळ करत हाेता. पत्नीने या छळाला कंटाळून एमआयडीसी पाेलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली हाेती. पुन्हा विजयकुमार आणि पत्नीमध्ये रविवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले. याबाबतची तक्रार देण्यासाठी पत्नीने एमआयडीसी पाेलीस ठाणे गाठले. यावेळी तिने आपल्या भावाला याची माहिती दिली. अखेर बहिणीच्या छळाने त्रस्त झालेले भाऊ गणेश चटनाळे, बसवराज चटनाळे यांच्यासह अन्य दाेघांनी बारा नंबर पाटी गाठली.

मेहुणा विजयकुमार पिल्ले याला काठी, लाकडाने जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याला लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान साेमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात पाेलीस हवालदार प्रताप वांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओमकार संजय धाेत्रे (२०, रा. वसवाडी, लातूर) गणेश शरणाप्पा चटनाळे (२३), बसवराज चटनाळे (३२) आणि शहानवाज वजीर पठाण (२१, सर्व रा. विकासनगर, कळंब राेड, लातूर) यांच्याविराेधात गुरनं. १०० / २०२२ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक दीपाली गीते करीत आहेत.

रागाच्या भरात झाला खून...
बहिणीचा सतत छळ हाेत असल्याने माहेरची मंडळी कमालीची त्रस्त झाली हाेती. मेहुण्याला याबाबत अनेकदा समज देण्यात आली हाेती. मात्र, व्यवसायाने चालक असलेल्या विजयकुमार पिल्ले आणि पत्नीमध्ये पुन्हा रविवारी भांडण झाले. याबाबतची माहिती पत्नीने भावाला दिली. रागाच्या भरात दाेघा भावांनी बारा नंबर पाटी गाठून मेहुणा विजयकुमार पिल्लेला काठी, लाकडाने जबर मारहाण केली. केवळ अद्दल घडवावी, या हेतूने ही मारहाण केल्याचे पाेलिसांनी सांगितले. मात्र, रागामध्ये केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मेहुण्याचा मृत्यू झाला.

Web Title: brothers saw sister's harassment, in temper they killed brother in law while beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.