लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी

By राजकुमार जोंधळे | Published: January 6, 2024 11:27 PM2024-01-06T23:27:54+5:302024-01-06T23:28:11+5:30

गुन्हा दाखल : बारा संशीयीतांची चाैकशी...

Brutal murder of youth in Latur city; Investigation of Twelve Suspects | लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी

लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी

लातूर : शहरातील एका ३८ वर्षीय तरुणाचा तिक्ष्ण हत्याने गळ्यावर, ताेंडावर, हातावर वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ताजोददीन बाबा नगर परिसरातील दर्गा येथे शनिवारी उघडकीस आली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी युनुस सुजातअली सय्यद (वय ५२, रा. ताजोददीनबाबा नगर, ह.मु. बुऱ्हाणनगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फारूख उर्फ मुकड्या सुजातअली सय्यद (वय ३८ रा. ताजोददीन बाबा दर्गा, लातूर) याचा गळ्याचे नळीवर, तोंडावर आणि हातावर अज्ञातांनी तिक्ष्ण हत्याराने गंभीर वार करुन खून केला. ही घटना शनिवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह लातुरातील शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. दरम्यान, हा खून काेणत्या कारणासाठी करण्यात आला आहे, याचा अद्याप उलगडा झाला नाही. ताे लवकरच हाेईल, असे पाेलिसांनी सांगितले. 

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुरन. १२/२०२४ कलम ३०२ भादंविप्रमाणे अज्ञात मारेकऱ्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक लिंगे करीत आहेत.

बारा संशयीतांची पाेलिसांकडून झडती...
याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याच्या तपास पथकाने दहा ते बारा संशीयत आराेपींना ताब्यात घेत कसून चाैकशी सुरु केली आहे. लवकरच यातील आराेपीचा शाेध लागेल, असा विश्वास आहे. - सुधाकर बावकर, पाेलिस निरीक्षक, लातूर

Web Title: Brutal murder of youth in Latur city; Investigation of Twelve Suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.