मंगरुळ, मरसांगवी येथील तिरु नदीवर बॅरेजेस उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:42+5:302020-12-23T04:16:42+5:30
जळकाेट तालुक्यातील मंगरुळ, मरसांगवी येथे मंजूर झालेल्या काेल्हापूरी बंधाऱ्याएवजी आता बॅरेजची उभारणी करावी, मरसांगवी येथील तिरु नदीवर दाेन ...
जळकाेट तालुक्यातील मंगरुळ, मरसांगवी येथे मंजूर झालेल्या काेल्हापूरी बंधाऱ्याएवजी आता बॅरेजची उभारणी करावी, मरसांगवी येथील तिरु नदीवर दाेन बंधाऱ्यांचे काम रखडले आहे. ते तातडीने मंगरुळ आणि मरसांगवी येथे मंजूर करुन कामाला गती द्यावी, अशीही मागणी दाऊद बिरादार यांनी निवेदनाद्वारे राज्यमंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यापूर्वी तिरु नदीवरील बॅरेजेसमध्ये या दोन्ही गावांचा समावेश होता. मात्र अचानकपणे दोन्ही गावचे बंधारे यातून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही गावातून तिरु नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. या दोन्ही गावांना बॅरेजेस मंजूर केले तर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. यातून सिंचन क्षेत्र वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्याचबराेबर नदी काठावरील गावांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येइल. हजाराे हेक्टरवरील शेतजमीनही सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शेतकरी आणि गावांचा विचार करत बेळसांगवी, मरसांगवी येथे बॅरेजेस मंजूर करावे, अशी मागणी मंगरूळ आणि मरसांगवी येथील सरपंचासह शेतकऱ्यांनी केली आहे.