आरोग्य केंद्राची इमारत महिनाभरात पूर्ण करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:17+5:302021-01-13T04:49:17+5:30
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बी. डी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे ...
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बी. डी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे उपस्थित होते. हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उदगीर, अहमदपूर, जळकोट व चाकूर या चार तालुक्यांच्या सीमा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. येथे दररोज १००पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी होत असते. रविवारी बाजाराच्या दिवशी १५०पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी असते. यामुळे रुग्णांसाठी जागा अपुरी पडू लागली. जुनी इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जीर्ण झाल्याने शासनाने निधी उपलब्ध करून देऊन नवीन इमारत बांधकामास २०१८ साली मंजुरी दिली. जानेवारी २०१९मध्ये कामास सुरुवात झाली. त्यामुळे दोन वर्षांपासून अपुऱ्या जागेत आरोग्य तपासणी व उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सदर कामाची पाहणी करून तत्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
अंगणवाड्यांची पाहणी...
हंडरगुळी गावातील अंगणवाड्यांना भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी भौतिक सुविधांची पाहणी केली. अंगणवाडीतील समस्या दूर करण्याचे आदेश ग्रामपंचायतीस दिले.