Video: बुलेटस्वारांचा 'फटाका' बंद; पोलिसांनी ५ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला राेलर!

By राजकुमार जोंधळे | Published: April 12, 2023 06:57 PM2023-04-12T18:57:12+5:302023-04-12T19:00:24+5:30

लातुरात कारवाईचा बडगा : हाैसी वाहनधारकांना पाेलिसांनी दिला दणका...

Bump the Bullet Riders; Police destroys the silencer worth 5 lakhs Raeler! | Video: बुलेटस्वारांचा 'फटाका' बंद; पोलिसांनी ५ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला राेलर!

Video: बुलेटस्वारांचा 'फटाका' बंद; पोलिसांनी ५ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला राेलर!

googlenewsNext

लातूर : शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पाेलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी लातूर पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. लातुरात कारवाई करण्यात आलेल्या जवळपास ५०० वाहनांचे सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविराेधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पाेलिसांनी थेट राेलर फिरवत ते नष्ट केले.

पाेलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हाैसी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पाेलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर गत महिनाभरात लातूर पाेलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (माॅडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबराेबरच त्या-त्या वाहनधारकांना हजाराे रुपयांचा दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

लातूर पाेलिसांची धडक माेहीम सुरू...
सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा माेठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पाेलिस अशांवर तातडीने कारवाई करीत आहेत. मात्र, काही वाहनधारक पाेलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पाेलिसांनी आता धडक माेहीम हाेती घेतली आहे. महिनाभरात तब्बल ५०० पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त केले आहेत.

५ लाखांचे सायलेन्सरपाेलिसांनी केले नष्ट...
लातूर पाेलिसांनी जप्त केलेल्या तब्बल पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर साेमवारी राेलर फिरवत ते नष्ट केले. डांबरी रस्त्यावर एका ओळीत सायलेन्सर ठेवून त्यावरून राेलर फिरविण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ लातूर पाेलिसांच्या ट्विटरवर अपलाेड करण्यात आला आहे. या कारवाईने फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

खबरदार! फटाका सायलेन्सर वापराल तर...
मिरवणूक, दुचाकी रॅलीसह लातुरात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांना जवळपास तीन लाखांवर दंड करण्यात आला आहे. दंड नाही भरला तर त्यांच्याविराेधात थेट न्यायालयातून नाेटीस काढली जाते. फटाका सायलेन्सर वापराल तर खबरदार... थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: Bump the Bullet Riders; Police destroys the silencer worth 5 lakhs Raeler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.