कासार बालकुंदा आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:20 AM2021-05-19T04:20:09+5:302021-05-19T04:20:09+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कासार बालकुंदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथील आरोग्य केंद्रात परिसरातील हल्लाळी, मिरगाळी, ममदापूर, तांबाळा, चिलवंतवाडी, पिरु ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कासार बालकुंदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथील आरोग्य केंद्रात परिसरातील हल्लाळी, मिरगाळी, ममदापूर, तांबाळा, चिलवंतवाडी, पिरु पटेलवाडी, कलमुगळी, बडूर तसेच कर्नाटक सीमा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. सध्या येथे लसीकरण तसेच कोविड चाचणी केली जाते. मात्र, एकाच डॉक्टरवर ताण पडत आहे. येथे दोन निवासी डॉक्टरांची पदे असतानाही एक डॉक्टर आहे. येथे तात्पुरत्या नियुक्तीवर असलेले डॉ. माकणे यांना येथेच नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी होत होती. मात्र, त्यांना पुन्हा अंबुलगा येथे पाठविण्यात आले आहे.
येथील डॉ. कस्तुरे यांच्यावर संपूर्ण ताण आहे. परिणामी, काही रुग्ण खाजगी दवाखान्याकडे वळवत आहेत. येथील रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. आणखीन येथे डॉक्टर नियुक्त करण्यात यावे, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले.