जळकोट तालुक्यातील २६ गावांचा अंतिम टप्प्यात प्रचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:34+5:302021-01-14T04:16:34+5:30
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, ते शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रमुख पुढाऱ्यांच्या गावातही या निवडणुका हाेत आहेत. गावागावातून रस्ते, ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, ते शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रमुख पुढाऱ्यांच्या गावातही या निवडणुका हाेत आहेत. गावागावातून रस्ते, चौक गजबजलेले असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. संधी देण्याची विनंती उमेदवारांकडून केली जात आहे. जळकाेट तालुक्यातील सोनवळा, बेळसांगवी, अतनूर, रावणकोळा, कुणकी, लाळी बु, बोरगाव, एकुर्का, घोणसी, चिंचोली, मेवापूर, धामनगाव, शेलदरा, विराळ, वडगाव, वांजरवाडा, शिवाजीनगर तांडा, सुल्हाळी, डोंगरगाव, येलदरा, गव्हाण, हाळद वाढवणा, मरसांगवी, पाटोदा खुर्द, कोळनूर, डोंगरकोनाळी या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. चिन्ह वाटपानंतर आता ग्रामीण भागात प्रचाराला सुरुवात झाली असून, ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी तिरंगी लढत हाेत आहे, तर वांजरवाडासारख्या मोठ्या गावात चौरंगी लढत होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी मतदारांना कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून उभा आहे, याची खात्री करून घ्यावी लागत आहे. या निवडणुकीत तालुकास्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिरुका ग्रामपंचायत मात्र बिनविरोध काढून ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज
प्रशासकीय पातळीवर मतदानाची तयारी सुरू असून, यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजा खरात, धनश्री स्वामी, निवडणूक विभागाचे शेख, पी. आर. घाटे, अलिम, तलाठी विश्वासराव धुप्पे, करेअप्पा आदी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सक्रिय झाले आहेत.