उमेदवार दारात अन् मतदार ऊसाच्या फडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:38+5:302021-01-10T04:14:38+5:30

एम. जी. मोमीन, लोकमत न्यूज नेटवर्क जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी, दुरंगी, ...

Candidates at the door and voters at the cane | उमेदवार दारात अन् मतदार ऊसाच्या फडात

उमेदवार दारात अन् मतदार ऊसाच्या फडात

Next

एम. जी. मोमीन,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी, दुरंगी, तिरंगी तर काही गावांमध्ये चौरंगी लढती होत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार मतदारांच्या दारात जात आहेत. मात्र, मजूर मतदार हे ऊसाच्या फडात असल्याने उमेदवारांची पंचाईत झाली आहे. या मतदारांचा उमेदवार व पॅनेल प्रमुखांकडून शोध घेणे सुरु झाले आहे.

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी राेजी मतदान होणार आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराचा ज्वर वाढला आहे. आरोप-प्रत्यारोप तसेच विकासकामांची आश्वासने देण्यात येत असल्याने दिवसेंदिवस गावागावांमधील निवडणुकीत रंगत भरत आहे. प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देण्यात येत आहे. मतदारही प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करत आहेत.

जळकोट तालुका हा डोंगरी असल्याने तालुक्यात वाडी-तांड्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बहुतांश ग्रामस्थ आपल्या कुटुंब कबिल्यासह दसऱ्यापासून ऊस तोडणीच्या कामासाठी स्थलांतरित हाेतात. त्याचबरोबर काहींनी कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद अशा मोठ्या शहरांचा रस्ता धरला आहे.

दरम्यान, उमेदवार गावातील घरापर्यंत पोहोचल्यानंतर घरात केवळ ज्येष्ठांशिवाय अन्य कुणीही दिसत नाही. त्यामुळे उमेदवारांसह पॅनेल प्रमुखांची अडचण झाली आहे. मतदार यादीतील उमेदवारांची यादी तयार करुन त्यांना मोबाईलवरुन फोन करुन मतदानासाठी येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्याला मतदान व्हावे म्हणून विविध प्रयत्नही केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

११ सदस्यांच्या ग्रामपंचायतीवर लक्ष...

जळकोट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला वेग आला आहे. काही गावांमध्ये दुरंगी लढती आहेत. मोजक्याच गावांमध्ये चौरंगी लढती हाेणार आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अतनूर, घोणसी, वांजरवाडा अशा ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मरसांगवी, बोरगाव, बेळसांगवी, रावणकोळा, धामणगाव, शेलदरा येथे तुल्यबळ लढती होत आहे.

Web Title: Candidates at the door and voters at the cane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.