कार-आॅटोची धडक; दोन ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:10 AM2018-05-11T01:10:53+5:302018-05-11T01:10:53+5:30

नळेगाव रोडवर कार आणि आॅटोत समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विश्रामगृहाच्या पलीकडे हा अपघात झाला. कारचालक फरार झाला आहे. 

car and auto accident; Two killed, four injured | कार-आॅटोची धडक; दोन ठार, चार जखमी

कार-आॅटोची धडक; दोन ठार, चार जखमी

Next

 लातूर - नळेगाव रोडवर कार आणि आॅटोत समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विश्रामगृहाच्या पलीकडे हा अपघात झाला. कारचालक फरार झाला आहे. 
उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील एक कुटुंबिय लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी उदगीर येथे आले  होते. कपड्यांची खरेदी करुन ते गुरुवारी रात्री ८.३० च्या दरम्यान  देवर्जनकडे जाण्यासाठी आॅटो क्रमांक एमएच २४ ई-५२४६ मध्ये बसून निघाले होते. दरम्यान, नळेगाव रोडवरील नवीन विश्रामगृहाच्या पलीकडे गेल्यानंतर समोरुन उदगीरकडे येणाºया कार क्रमांक एमएच १४ ईसी ०९८८ च्या चालकाने आॅटोला समोरून जोराची धडक दिली. 
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आॅटो चालक मधुकर सूर्यवंशी (४५, रा. फुलेनगर, उदगीर), उद्धव विश्वनाथ कांबळे (५५, रा. देवर्जन) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर आॅटोमधील अनुसया निवृत्ती कांबळे (५०) गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता लातूर येथे हलविण्यात आले आहे. तसेच विश्वजीत राहुल जगताप (१० रा. लातूर), किरण बाबासाहेब दंडे (९), दिलीप गायकवाड (४८, रा. चवण हिप्परगा)  या जखमींवर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती समजताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोउपनि बाबासाहेब थोरे, पोउपनि अल्ताफ मुलाणी, पोउपनि ज्ञानेश्वर बसवंते यांनी घटनास्थळावर भेट दिली.

Web Title: car and auto accident; Two killed, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.